व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, तक्रारी सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेली सारथी हेल्पलाइन सक्षम करण्याकडे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी लक्ष केंद्रित केले.एखादी तक्रार तिसऱ्यांदा सारथीकडे आली.
तर, संबंधित विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांकडे ही तक्रार जाणार आहे. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त या तक्रारीचे निवारण करणार आहेत.शहरातील नागरिकांना महापालिकेशी निगडीत येणाऱ्या समस्या, तक्रारी करण्यासाठी सारथी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. मात्र, सारथीवरील तक्रारींकडे अनेक अधिकारी दुर्लक्ष करत होते. तसेच तक्रार न सोडविताच ती बंद केली जात होती. त्यामुळे तक्रारींची संख्या वाढत होती. सारथीकडे आयुक्त सिंह यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. सिंह यांनी गेल्या महिन्यात सारथीचा आढावा घेत 15 दिवसांपेक्षा जास्त एखादी तक्रार प्रलंबित ठेवल्यास तक्रार का प्रलंबित ठेवली, याची विभागप्रमुखांना कारणे द्यावी लागतील, असा इशारा दिला होता. तसेच महिन्यातील पहिल्या आणि तिसऱ्या सारथीवरींल तक्रारींची आढावा घेण्यास सुरुवात केली.
Discussion about this post