व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –
*वसंतऋतूप्रमाणे आगामी निवडणुकीत निश्चत बदल घडणार, काँग्रेसच्या हातीच लोकं सत्ता देणार – नाना पटोले यांनी व्यक्त केला विश्वास*
पिंपरी-चिंचवड । व्हीएसआरएस न्यूज । विशेष प्रतिनिधी।
देशात बीजेपी आणि काँग्रेस हे दोनच पक्ष सध्या मोठे आहेत. परंतु, केंद्रातील मोदी सरकाने देशाची अधोगती केली आहे. तरुण, युवक हे बेरोजगार झालेले आहेत. त्यामुळे सर्वच स्तरातून भाजपवर लोक नाराज आहेत. त्यामुळे लोकांना आता सर्वत्र बदल हवा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असोत, अथवा महानगर पालिका असतो. लोकांना आता काँग्रेसशिवाय पर्याय नाही. हे सर्वांनाच कळाले आहे, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्य नाना पटोले यांनी व्हीएसआरएस न्यूजसोबत बोलताना व्यक्त केला. शनिवार पिंपरी-चिंचवड शहरात काँग्रेसच्यावतीने दुचाकी फेरीद्वारे संचलन करण्यात आले व जणू आगामी महानगर पालिकेच्या निवडणूकीचे रणशिंग फुंगले.
यावेळी व्हीएसआरएस न्यूजशी बोलताना पटोले यांनी आगामी निवडणूकीची तसेच एकूणच काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसने खूप काही केलेले आहे. लोकांना फक्त मोठमोठी आश्वासने दिलेली नाहीत तर ती आश्वासने पूर्णदेखील केलेली आहेत. आगामी काळात काँग्रेसच देशाला पुढे नेऊ शकते. गोव्याचा निवडणूकीचा मी स्टार प्रचारक आहे. त्या ठिकाणी भाजपविरुद्ध सर्वत्रच रोष पहायला मिळत आहे. केवळ गोव्यातच नव्हे तर संपूर्ण देशभर देशभर भाजपविरोधात रोष व्यक्त होतोय.
पिंपरी-चिंचवड, पुण्यात भाजपने लोकांना दिव्य स्वप्न दाखवून महापालिका ताब्यात घेतल्या आहेत. विकासाचा पूरता ऱ्हास भाजपने केला आहे. भाजपच्या अशा नितीमुळेच लोकांना त्यांचा विट आलेला आहे. त्यामुळे लोकांना आता काँग्रेसचे महत्त्व कळत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये लोकांना आता काँग्रेसच पर्याय उरलेला आहे. परिणामी आगामी निवडणूकीत निश्चितपणे महापालिकेची सत्ता आमच्याच ताब्यात येणार आहे. कारण आम्ही आता तरुण वर्गाला प्रतिनिधीत्व देणार आहोत. तसेच काँग्रेसच्या माध्यमातून इथल्या लोकांना न्याय देण्याचे काम करणार आहोत. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या हातात लोकं सत्ता देणार हे मात्र नक्कीच, असाही विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचा प्रदेशाध्य होऊन वर्षपूर्ती होत आहे. विशेष म्हणजे आज वसंतपंचमी आहे. आणि आजपासूनच या संचलन रॅलीद्वारे आम्ही परिवर्तनाच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. आता या ठिकाणी पालवी फुटून हरित पिंपरी-चिंचवड सर्वानाच पहायला मिळेल. यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
भाजप निती यूज अॅण्ड थ्रू… आहे. गोव्यात ज्या मनोहर पर्रीकरांच्या नावाने सध्या भाजप निवडणूक लढवत आहे आज त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना भाजपने वाळीत टाकले आहे. पर्रिकरांच्या मुलाला भाजपने उमेदवारी नाकारली. लोकांना काँग्रेसचे महत्त्व खऱ्या अर्थाने कळाले आहे.
*डिजीटल सदस्य नोंदणीवरआम्ही भर देणार आहोत.*
हल्ली सर्वच जण स्वबळाचा नारा देत आहेत. मात्र आम्ही कोणाच्या मागे धावणार नाही. कांँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मूठ बांधून कोणी सोबत येणार असेल तर आम्ही निश्चित सोबत निवडणूक लढवू, असेही नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपने जसे मिस कॉल्ड ही मोहिम राबवली आहे तशी आम्ही डिजीटल सदस्य नोंदणी ही अभिनव सदस्य नोंदणी मोहिम राबविणार आहोत. असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
Discussion about this post