व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस वतीने शनिवार ५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत भव्य दुचाकी परिवर्तन रॅलीचे आयोजन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन करीत काँग्रेस सर्व शक्तीनिशी या महानगरपालिका निवडणुकीत लढणार असल्याचे संकेत शहर काँग्रेस वतीने या दुचाकी रॅली द्वारे देण्यात आले. या दुचाकी परिवर्तन रॅलीचे नेतृत्व पिंपरी-चिंचवड शहराचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी केले.
या दुचाकी परिवर्तन रॅलीमध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव सचिन साठे यांनी नाना पटोले यांचे स्वागत केले.त्यावेळी कार्याध्यक्ष दिलीपशेठ पांढरकर डॉ कैलास कदम आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच ही रॅली मुकाई चौक- रावेत – वाल्हेकरवाडी- चाफेकर चौक- स्व. रामकृष्ण मोरे नाट्यगृह मार्गे – चिचंवड लोकमान्य पुल पार करून उजवी कडे मोरवाडी चौकातून – डावीकडे- सम्राट चौक कडून उजवी कडे अजमेरा कॉलनी वास्तू उद्योग – चौक- झिरो बॉईज चौक- नेहरूनगर सिग्नल महेशनगर संत तुकाराम – नगर- वल्लभनगर पुढे पुण्याकडे नाशिकफाटा मार्गे पुण्याकडे रवाना झाले. या मार्गाने रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
Discussion about this post