व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –शहरात असणाऱ्या महत्वपूर्ण सोयी सुविधा तसेच शहराच्या दृष्टीने माईलस्टोन ठरणाऱ्या प्रकल्प, उपक्रम आणि योजनांची माहिती प्रत्येक नागरिकाला असावी, यासाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी नागरी सहभाग घेतल्यास माहितीचे वहन सहजतेने करता येईल.
त्यादृष्टीने जनसंवाद सभा देखील माहितीच्या आदान प्रदानासाठी प्रभावी माध्यम असून, अधिकाऱ्यांनी नागरिकांपर्यंत विविध माहिती पोहचवण्यासाठी जनसंवाद सभांचा आधार घ्यावा, असे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी मांडले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या आशा आणि आकांक्षांचे प्रतिबिंब महापालिकेच्या ध्येय धोरणे, विविध निर्णयात दिसावे तसेच शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्याच्या हेतूने जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते.
आठही क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी, सुचिता पानसरे, सोनम देशमुख, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, शीतल वाकडे, विजयकुमार थोरात हे सर्वा क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत मार्गदर्शन करतील.
Discussion about this post