व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी चिंचवड शहरात नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमीत्त वास्तवास असलेल्या लेवा पाटीदार समाजाने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाला दिलेला एकतेचा संदेश हा एक वसा म्हणून जपला आहे. औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात लेवा पाटीदार समाजाचे योगदान असल्याचे प्रतिपादन भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले. निवृत्ती लॉन्स, रावेत येथे लेवा पाटीदार समाजाचा लेवा जल्लोष “स्नेह एवं सांस्कृतिक मेळावा” शनिवारी सायंकाळी पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी, माजी सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके, एलएमसी ग्रूपचे अध्यक्ष मिलींद चौधरी, सांगवी लेवा पाटीदार मित्र मंडळाचे अध्यक्ष भागवत झोपे, पिंपरी चिंचवड भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष नीना खर्चे, डॉ. यतिन भोळे, बहिणाबाई महिला मंडळ अध्यक्ष विजया जंगले, पुरुषोत्तम पिंपळे, कृष्णा खडके, विनोद इंगळे, दिपक भोंडवे, सोमनाथ भोंडवे आदी मान्यवरांसह पुण्यातील लेवा बांधव आणि भगिनींनी अत्यंत उत्फुर्तपणे प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वांचे लक्ष वेधले. यामध्ये, गणेश वंदना (अनुभूति बेबी शोवर गृप), गार्गी चौधरी, सिध्दी चौधरी, शरयु आणि पूर्णा चौधरी (नृत्य), अक्षय कोल्हे, आरुषी पाटील (तबला वादन), मोनीका पाटील (एकपात्री नाटक), बहिणाबाई महिला मंडळ (टाळ पथक, गोंधळ), राज वायकोळे, प्रणव पाटील (मर्दानी खेळ), वंदना ढाके, पर्णिता ढाके, रुपाली नारखेडे (योग सादरीकरण), अथर्व नारखेडे, विवेक नारखेडे (अभंग), कुनिका पाटील, वेदिका पाटील, ज्ञानेश्वरी वायकोळे, खुशी पाटील, देव चौधरी, महिमा भोळे (नृत्य), पूर्वा जंगले (शास्त्रीय नृत्य, भरतनाट्यम), प्रितम तळेले (मिमिक्री), वंदना ढाके, पर्णिता ढाके, प्रदीप नेहते, निलेश इंगळे, बाळकृष्ण चौधरी, निलेश इंगळे, पल्लवी चोपडे, सुनीधी कोळंबे, विनिता कोळंबे, मिलिंद कोळंबे (गायन), स्पृहा राणे (गणपती स्त्रोत) यांनी कार्यक्रमात रंगत आणली.
Discussion about this post