Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरात दि. ७ डिसेंबर रोजी रात्री एका व्यक्तीवर दोघांनी घरात घुसून तलवारीने वार केले होते. गंभीर जखमी झाल्या त्या व्यक्तीवर बिर्ला रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निगडी पोलिसांनी या प्रकरणी त्वरेने तपास करत अवघ्या आठ तासात दोघांना अटक केली होती. त्यांना पोलिसी खाक्या दाखवला असता त्यांनी जखमी व्यक्तीच्या खुनाची सुपारी त्याच्या पत्नीनेच दिल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली असून तिने गुन्हाची कबुली दिली आहे.
७ डिसेंबर रोजी आकुर्डीतील मिठाईलाल बरुड (वय ४०) याच्या घरात घुसून दोघांनी त्याच्यावर तलवारीने वार केले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांनी त्यातील आरोपी अमन पुजारी याला ओळखले. त्यानंतर त्वरेने हालचाल करीत अवघ्या ८ तासात पोलिसांनी शिवम दुबे ऊर्फ दुब्या आणि अमन पुजारी (दोघेही रा. पंचतारानगर, आकुर्डी)यांना ताब्यात घेतले चौकशीमध्ये त्यांनी हा गुन्हा मृताच्या पत्नीकडून सुपारी घेऊन केल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी मिठाईलालच्या पत्नीला ताब्यात घेतले. तिने सुपारी दिल्याची कबुली दिली. त्यामुळे तिलाही अटक करण्यात आली.
आठ मुली झाल्या. पण, मुलगा होत नसल्याने पती छळ करत होता. तसेच तो दुसरे लग्न करण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे त्याच्या खुनाची सुपारी आपण अमन पुजारी याला दोन लाख रुपयांची सुपारी दिली. या आधी आपण पतीला ठार मारण्यासाठी विषप्रयोगाचाही प्रयत्न केला होता. मात्र, पती सावध असल्याने हा प्रयत्न फसला; असे तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
Discussion about this post