व्हीएसआरएस मराठी न्युज –मराठी भाषेत पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करणेबाबत…निवेदन देण्यात आले.
सर्व दुकाने, हॉटेल व इतर आस्थापना यांनी दुकानावर मराठी भाषेत पाट्या/बोर्ड लावणे बंधनकारक असून त्या पाट्या लावण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने सर्वांना २ महिन्यांची मुदत दिली होती. ती मुदत २५ नोव्हेंबर २०२३ रोजी संपलेली आहे.
यापूर्वी मराठी भाषेत पाट्या लावण्याविरोधात काही व्यापारी संघटना यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, परंतु सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली व दोन महिन्यात सर्व दुकानांवर ठळकपणे मराठी भाषेत पाट्या/बोर्ड लावण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील अनेक दुकानांवर आजही मराठी भाषेत पाट्या लावलेल्या दिसून येत नाहीत. शहरातील सर्व दुकाने, हॉटेल, आस्थापना यांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळणे अपेक्षित असताना बऱ्याच ठिकाणी त्याची अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही.
या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येत आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांप्रमाणे आपल्या आठही क्षेत्रीय कार्यालयामार्फत, त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व दुकाने, हॉटेल, आस्थापना यांना त्वरित मराठी भाषेत पाट्या लावण्याबाबतचे निर्देश देऊन सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगावे.
२५ नोव्हेंबर २०२३ नंतर ज्या दुकानांवर, हॉटेलवर, आस्थापनांवर मराठी भाषेत पाट्या लावलेल्या दिसणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषेत पाट्या लावण्यासंदर्भात पिंपरी चिंचवड शहरात तीव्र आंदोलन केले जाईल. त्यावेळी जर काही तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली तर त्यास केवळ आपण जबाबदार असाल याची आपण गंभीर नोंद घ्यावी. (मुंबई महानगरपालिकेने २५ नोव्हेंबर २०२३ नंतर मराठी भाषेत पाट्या लावल्या नसतील तर त्या दुकानांना कोणतीही नोटीस न देता थेट कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.)
वरील विषयाचे गांभीर्य ओळखून योग्य ती कार्यवाही कराल व पुढील होणारे आंदोलन टाळाल, ही अपेक्षा.
मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड आयुक्तालयत
निवेदन देताना – सचिन चिखले , विनोद भंडारी , सिमाताई बेलापुरकर , सगिता देशमुख , अनिता पांचाळ, प्रतिसिह परदेशी , राजु भालेराव , हेमत डांगे , अनिकेत प्रभु , आदिती चावरीया , रुपेश पटेकर , राजु सावळे , सर्व मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्याविरोधात करावाई करावी. तसेच येत्या आठ दिवसांत सर्व दुकानांना मराठीत पाटया लावण्यात याव्यात. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू आहे.
Discussion about this post