व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी(प्रतिनिधी) महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब.यांच्या प्रेरणेने व मावळचे लोकप्रिय महासंसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांच्या मार्गदर्शनानुसार मावळ लोकसभा मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांनी प्रवेश केला.
हा कार्यक्रम वाल्हेकरवाडी येथे संपन्न झाला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वाल्हेकर म्हणाले कि, देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या कार्याचा ठसा जगभर उमटत आहे तर राज्यात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे जनतेची सेवा करीत आहे. नुकताच त्यांनी शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई बाबतीत मोठा दिलासा दिला आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे सर्वांसाठी कार्य करीत असल्याचे दिसून येत आहे.आणि खासदार अप्पा बारणे तर सर्वांना परिचीत आहेच ते मावळ मतदारसंघातून हॅटट्रिक मारणारच आहे यात तिळमात्र शंका नाही.
पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शेकडो महिलांनी प्रवेश केला. यामध्ये सुवर्णा कुटे, सुरेखा हिरालाल वारडे, सारिका गवारे, अपर्णा आगाशे, मालती वारडे, जयश्री चिकणे, सुप्रिया पॅंटी, श्रद्धा कापडी, मालती सोनवणे, उषा सोनवणे, शोभा शहा, दीप्ती खानविलकर, जया क्षीरसागर, सुनीता कांबळे, चित्रा गालकडे, भारती मोहिते, तसेच जुन्या महिला पदाधिकाऱ्यांना पदोन्नती पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
यासाठी प्रामुख्याने पिंपरी विधानसभा संघटिका शैलाताई निकम, व शहर संघटिका सरिताताई साने यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, तसेच शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस, ज्येष्ठ शिवसैनिक केशव सरोदे, संगीताताई कदम, अंजली चव्हाण, छायाताई बाळासाहेब वाल्हेकर. व सर्व शिवसैनिक महिला उपस्थित होत्या
Discussion about this post