व्हीएसआरएस मराठी न्युज -निगडी(प्रतिनिधी) श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरणच्या वतीने श्री अग्रसेन महाराज जयंती निमित्ताने निगडी येथील गदिमा नाट्यगृहातमध्ये ” एक नई उडाण” या सांस्कृतिक महोत्सवाचे करण्यात आले होते.
या महोत्सवाचे उदघाटन ओजस लाइफचे संचालक अतुल शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
आयपीएस अंकित गोयल यांनी ध्वनिमुद्रित संदेश पाठवला. या संदेशात ते म्हणाले कि, अग्रसेन जयंती सारखे सामाजिक कार्यक्रम नियमित राबवणे गरजेचे आहे. यामुळे सामाजिक सलोखा आणि बांधिलकी जपली जाते. विद्यार्थ्यांना देखील आपल्यातील गुणदर्शनासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होते. ट्रस्ट जे सामाजिक,धार्मिक ,आध्यात्मिक कार्यक्रम राबवत आहेत ती कौतुकास्पद बाब आहे.
यावेळी पुणे आगरवाल समाज फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, माजी उपमहापौर शैलजा मोरे, राजू मिसाळ, माजी नगरसेवक अमित गावडे, शर्मिला बाबर,भाजपचे अमित गोरखे,सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे, अग्रसेन ट्रस्टचे अध्यक्ष सुनील अगरवाल, माजी अध्यक्ष, पंच समिती आदी मान्यवर उपस्थित होते.
कृष्णकुमार गोयल म्हणाले कि, चूल आणि मुल या पुरतेच महिला सिमीत राहिल्या नाहीतर प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असतात पहायला मिळत आहे.घरातील सर्व जबाबदारी समर्थपणे पार पाडून या ठिकाणी महिलांनी आपली कला सादर केली हे कौतुकास्पद बाब आहे.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील आगरवाल म्हणाले कि, अग्रसेन ट्रस्टच्या कार्यकारी मंडळात महिलांना ३० टक्के आरक्षण देण्यात येईल. जेणेकरून महिलांची संख्या वाढेल.महिलांच्या कलागुणांना वाव मिळेल.
सीए के एल बंसल म्हणाले कि, अग्रसेन ट्रस्टच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या धर्मादाय दवाखान्यामध्ये रोज २ हजार रुग्ण ओपीडीचा लाभ घेत आहे.
यावेळी कॉमेडी किंग सुनील पाल,हास्यकवी सम्राट मुकेश गौतम यांनी विनोदी किस्से सांगून प्रेक्षकांना खदखदून हसवले.
तर ढोलकीच्या तालावर स्पर्धेची विजेती नम्रता सांगुळे हिच्या नृत्याने रसिकांकडून टाळ्यांची दाद मिळवली. विक्रम इमोर्टल्स ग्रूप,पिंक पर्ल्स ग्रूप,गोल्डन ग्लॅम,सेव्हन स्टार,ग्लोविंग गर्ल्स, स्वीट डिझास्टर, इनविंसिबल क्वीन्स, डांसिंग डिवाईन या नृत्य समूहाने आपली नृत्यकला सादर केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
अध्यक्ष सुनील रामेश्वरदास अग्रवाल, कार्याध्यक्ष
सुभाष बन्सल, सचिव सत्पाल मित्तल, सहसचिव सुनील जे.अगरवाल, खजिनदार अशोक बंसल, भवन व्यवस्थापक विनोद मित्तल,जोगिंदर मित्तल, वैद्यकीय व नवनिर्माण समिती प्रमुख सीए कृष्णलाल बंसल, विनोद शि. बंसल,सांस्कृतिक समिती अध्यक्ष गौरव आगरवाल,सदस्य धर्मेंद्र आगरवाल, आनंद आगरवाल, संदीप गुप्ता,सागर आगरवाल, सल्लागार जगदीश प्रसाद सिंघल , आगरवाल महिला मंडळ, श्री अग्रसेन युथ संघ यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ओंकारेश्वरी जमखंडी तर आभार सत्पाल मित्तल यांनी मानले.
Discussion about this post