व्हीएसआरएस मराठी न्युज निगडी-निगडी येथील दिवाण हॉस्पिटलमध्ये डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या डी पी यु आय व्ही एफ आणि एन्डोस्कोपी सेंटरच्यावतीने वंध्यत्व निवारण व उपचारासाठी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन गुरुवार दि.19 ऑक्टोबर 2023 रोजी स. 10 ते दु.12 वा करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये मार्गदर्शन वंध्यत्वरोग तज्ज्ञांद्वारे करण्यात येईल.
वंध्यत्वाने ग्रस्त महिला व पुरुष यांनी वंध्यत्व निवारण व उपचारासाठी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. हे दिवाण हॉस्पिटल, बी जी कॉर्नर, निगडी, पुणे येथे होणार आहे तसेच प्रत्येक गुरुवारी याच ठिकाणी हे शिबीर आयोजित होणार आहे.
अधिक माहितीसाठी ७६२०५९८८६७ व नाव नोंदणीकरिता संपर्क क्र. ८०८०७०७६९१ वर संवाद साधू शकता
Discussion about this post