व्हीएसआरएस मराठी न्युज –नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी- चिंचवड शहरातील गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. सांगवी आणि वाकड पोलिस ठाण्याची हद्द असलेल्या राहटणी आणि पिंपळे सौदागर येथे मध्यरात्री एकूण 20 ते 22 वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. शनिवारी 31 डिसेंबर असल्याने शहरात दीड हजारापेक्षा जास्त पोलिस बंदोबस्त होता.
अज्ञात चार ते पाच जणांच्या टोळक्याने रिक्षातून येऊन दिसेल त्या दुचाकी, चारचाकी ला लक्ष करत कोयत्याने, सिमेंटच्या गट्टूने वाहनांची तोडफोड केली आहे. तोडफोड करणाऱ्या टोळक्याला पकडण्याचा प्रयत्न वाकड पोलिस कर्मचाऱ्याने केला. पण, त्यांना धक्काबुकी करून अज्ञात तोडफोड करणारे व्यक्ती पसार झाले आहेत. याबाबत सांगवी, वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.
Discussion about this post