व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –बृहन्मुंबई महानगरपालिके प्रमाणे पिंपरी-चिंचवड माहापिलिकेच्या मागील पाच वर्षाच्या कामाची कॅग मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई महापालिकेच्या 12 हजार कोटी रक्कमेच्या 76 प्रकल्पातील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराबाबत आपण विधिमंडळांमध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे चौकशीची शिफारस कॅगकडे( केली. या चौकशीला तातडीने मंजूर मिळुन हि चौकशी होत आहे. अशाच प्रकारचे गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मागील पाच वर्षात झाले आहेत. त्यामुळे पुढील प्रकरणांची मुंबई महापालिकेप्रमाणेच तातडीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची देखील कॅग मार्फत सखोल चौकशी व्हावी.
Discussion about this post