Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील सर्व हौसिंग सोसायट्यांसाठी दि. १६ डिसेंबर रोजी मोशी येथे स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनने यासाठी पुढाकार घेतला असून यामध्ये सोसायटीधारकांच्या समस्यांवर विचारविनिमय होणार आहे. हा मेळावा साधुराम गार्डन मंगल कार्यालय, नाशिक- पुणे हायवे, साईनाथ हॉस्पिटल समोर मोशी येथे सायंकाळी ६ ते रात्री १० यावेळेत होणार आहे. फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी ही माहिती दिली.
शहरात सहा हजाराहून अधिक सहकारी गृहरचना संस्था आहेत. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यावर साधक-बाधक चर्चा करण्यासाठी तसेच फेडरेशनची भविष्यातील भूमिका ठरविण्यासाठीविचारविनीमय होणार आहे.
हा स्नेहमेळावा सर्व सोसाट्यांमधील सर्व सदस्यांसाठी आहे. त्यामध्ये सर्व सदस्यांसाठी करमणूक म्हणून ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आलेला आहे. उपस्थित सदस्यांसाठी भोजनव्यवस्था केली आहे.
सोसायटीधारकांना समस्या मांडता याव्यात म्हणून कार्यक्रमस्थळी एक ड्रॉप बॉक्स ठेवला जाणार आहे. सदस्य आपल्या भागातील अडीअडचणी कागदावर लिहून त्यामध्ये टाकू शस्कतात. त्यानंतर पाठपुरावा करून या सर्व समस्या सोडवल्या जातील. शहरातील सर्व सोसायटीमधील सर्व सदस्यांनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन फेडरेशनने केले आहे.
Discussion about this post