Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हेशाखा युनिट ४ ने ऑनलाईन टास्क देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुबाडणार्या एका आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार या राज्यातून अद्यापर्यंत १४ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
चिंतन शशिकांत फडके वय ३५ वर्षे, रा. ५०१, बी-३, न्युयॉर्क सिटी टाउनशिप, निहालपुर मुडी, इंदौर, मध्यप्रदेश,
ब्रजराज रामरतन वैष्णव वय १८ वर्षे, रा. रातकोट, विजयनगर, मिलवाडा, राजस्थान,
सुंदरदास चेतनदास सिंधी, वय २४ वर्षे, रा वॉर्ड न. १७. गुलाबपुरा, राजस्थान
राजेश भगवानदार करमानी, पय-२६ वर्षे, रा. शिवाजी मोहल्ला, नवाब का बेडा, अजमेर, राजस्थान.
मोहम्मद रशिद चांद मौहम्मद, वय ४७ वर्षे, रा. राजपुत मोहल्ला, राताकोट, अजमेर, राजस्थान
अभिषेक सत्यनारायण पाराशर, वय-२४ वर्षे, रा-कोठडी मोहल्ला, रायला, ता बनेडा, जि-मिलवाडा, राजस्थान
आशिष प्रल्हादराय जाजु, वय-३५ वर्षे, रा-हाकटाऊन कंट्री वुडस सोसायटी, टिळेकरनगर, कोढवा, पुणे
मोहम्मद रौफ मोहम्मद रशिद, वय-२४ वर्ष, रा-मु.पो. राताकोट, ता-विजयनगर, जि-अजमेर
नवीनकुमार नेवन्दराम आसनाणी, वय-५० वर्षे, रा. ६. नळकंठ कॉलनी, शास्त्रीनगर, मिलवाडा, राजस्थान,
विकास सुरेश गोवर्धनदास सिंधी, वय-३२ वर्षे, रा-सिपी कॉलनी, चेजाजी मंदिरा मागे, गुलाबपुरा, राजस्थान
गौरव महावीर सेन, वय ३१ वर्षे, रा श्री राम मंदिरा मागे, गुलाबपुरा, राजस्थान
ललित नवरतन मल पारिक, वय ३३ वर्षे, रा. मु.पो. रुपाहेली, ता-हुर्डा, जि-मिलवाडा, राजस्थान
मनिष ऋषिकेश वैष्णव, वय-३३ वर्षे, रा-शास्त्री नगर, गुलाबपुरा, जि मिलवाडा, राजस्थान
अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी अद्यापपर्यंत पिंपरी चिंचवड, पुणे, बंगळुरू, आगरा, हावडा येथे केलेले आर्थिक फसवणुकीचे १७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने राज्य सायबरक्राईम विभागाचे साह्य मागण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिली.
त्या म्हणाल्या, अलिकडे ऑनलाईन टास्क देण्याच्या आमिषाने फसवणूक करण्याचे प्रकार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढीस लागले होते. १५ डिसेंबर रोजी एका महिलेने अशाचप्रकारे ऑनलाईन ७१ लाख ८२ हजार ५२० रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार हिंजवडी पोलीसठाण्यात नोंदविली होती त्या अनुषंगाने आयुक्तालयाच्या सायबर क्राईम विभागाने संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना एका बँक खात्याची माहिती मिळाली. त्या आधारे अधिक तपास केला असता या मागे एक मोठी आंतरराज्य टोळी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपींनी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी त्रिस्तरीय यंत्रणा उभारली होती.त्यामध्ये एक स्तर गरजू लोकांकडून त्यांचे आधारकार्ड वगैरे वैयक्तिक डिटेल्स घेऊन त्यांच्या नावे बँक खाती उघडत असे. दुसरा स्तर ऑनलाईन टास्क करण्यासाठी इच्छुक व्यक्तिंना जाळ्यात ओढण्याचे काम करत असे. तर तिसरा स्तर आलेला पैसा गरजू लोकांच्या खात्यात जमाकरून काढून अन्यत्र वळविण्याचे काम करत असे.
या त्रिस्तरीय यंत्रणेमुळे हा पैसा शेवटी कोठे जात आहे हे शोधून काढण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत.
या फसवणुकीला बळी पडलेले लोक प्रामुख्याने आयटी क्षेत्रातील आणि टेक्नोसॅव्ही आहेत. तसेच आरोपीही सुशिक्षित आहेत. त्यातील एकजण बँकेत काम करत होता. असेही गोरे म्हणाल्या.
Discussion about this post