Pimpri News : पिंपरी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा पथक ४ ने पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनाचे दागिने हिसकावून पळ काढणार्या चोरांसह ते दागिने विकत घेणारे सोनार आणि दागिने विकण्यासाठी चोर आणि सोनार यांच्यात मध्यस्ठाची भूमिका बजावणार्यास अटक केली आहे.या प्रकरणात २५५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्हे करताना वापरलेली मोटारसायकल असा १६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
आनंद सुनील साळुंखे उर्फ लोहार वय १९, राहणार खडकी स्मशानभूमीजवळ, अक्षय अशोक मुरकुटे वय ३१, मुंजाबा वस्ती धानोरी, धीरज गोपाळ गवळी वय ३१ गवळीवाडी, खडकी, गणपत जवाहरलाल शर्मा, वय ४४, मांगल्य सोसायटी, खडकी, दर्शन रमेश पारीख, वय ३२, निता कॉर्नर, खडकी अशी अटक करण्यात आलेल्यांचे नावे असून महादेव उर्फ महाद्या उर्फ अजय गौतम थोरात, राहणार खडकी याचा शोध पोलीस घेत आहेत
या बाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे म्हणाल्या शहरात चेनस्नॅचिंगचे गुन्हे वाढले असल्याने पोलीस पथक तपास करत होते. सुमारे ७० ते ८० सीसीटीव्ही कॅमेर्यांची फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना चोरटे खडकीकडून येत असल्याचे समजले. या प्रकरणी आरोपी आनंद साळुंखे याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता त्याने. फरार आरोपी महादेव उर्फ महाद्या उर्फ अजय थोरात याच्या साह्याने हे गुन्हे केल्याची कबुली दिली. चोरीचे दागिने अक्षय मुरकुटे आणि धीरज गवळी यांच्या मध्यस्थीने सोनार गणपत शर्मा आणि दर्शन पारीख यांना विकल्याचेही त्याने कबूल केले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली.
या आरोपींच्या अटकेमुळे पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरातील १४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपी आनंद साळुंखे, धीरज गवळी आणि महादेव थोरात हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पुणे, पिंपरी चिंचवड परिसरात गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चैबे, सह आयुक्ल्त डॉ. संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त सतीश माने, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ४ चे वरीष्ट्न निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक सिद्धनाथ बाबर, उपनिरीक्षक गणेश रायकर, आबासाहेब किरनाळे, सहायक उपनिरीक्षक नारायण जाधव, संजय गवारे, दादा पवार, आदिनाथ मिसाळ, हवालदार प्रवीण देवळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, सुरेश जायभाये, रोहिदास आडे, नाईक वासुदेव मुंडे, सुनील गुट्टे, शिपाई प्रशांत सैद, धनाजी शिंदे,गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे यांनी केली.
Discussion about this post