पिंपरी : भोसरी, एमआयडीसी पोलिसांनी दि. १४ जानेवारी रोजी मध्यरात्री एका तडीपार गुंडाला अटक केली. यावेळी त्याच्याजवळ एक भरलेले पिस्तूल आढळले.
करण कुमार जाधव (वय २६, रा. लक्ष्मीनगर, मोशी) असे त्याचे नाव आहे.
रविवारी मध्यरात्री भोसरी, एमआयडीसी पोलिसांचे पथक हवालदारवस्ती, मोशी येथे गस्त घालत असताना तेथे एक तडीपार गुंड रिक्षाने आला असून तो सशस्त्र आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रिक्षाचा पाठलाग केला त्यावेळी रिक्षातील दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना त्यातील एकास पकडण्यात यश आले.
त्याची चौकशी केली असता त्याचे नाव करण जाधव असून तो तडीपार गुन्हेगार असल्याचे उघड झाले. त्याच्यावर पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरातील वेगवेगळ्या पोलीसठाण्यात २० गुन्हे दाखल आहेत.
Discussion about this post