Pimpri News : पिंपरी : पिंपरी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात काम करणा-या एका कामगाराने रुग्णांकडून स्वीकारलेल्या बिलांची रक्कम बनावट पावत्या तयार करून हडप केली होती. या प्रकरणी आता पिंपरी पोलीसठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
आदित्य अंकुश खंडागळे (वय 23, रा. जाधववाडी, चिखली) असे आरोपीचे नाव असून संजीव शांताराम भांगले (वय 57, रा. पिंपरी गाव) यांनी तक्रार दिली आहे.
आरोपी बीव्हीजी या ठेकेदार कंपनीमार्फत वायसीएम रुग्णालयात कामास होता. तो रुग्णांकडून आलेली बिले स्वीकारण्यासाठी कॅश काऊंटर सांभाळत असे. रुग्णांकडून आलेली रक्कम स्वीकारून पावत्या देणे हे त्याचे काम होते. त्याने बनावट पावत्या तयार केल्या आणि रुग्णांकडून स्वीकारलेल्या रकमेचा अपहार केला. एकंदर ६८ हजार २६० रुपयांचा अपहार त्याने केला असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
Discussion about this post