Mumbai News : मुंबई : कुर्ल्यातील लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये बुधवारी दुपारी भीषण आग लागली. वृत्तानुसार,टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील जनआहार कॅन्टीनमध्ये दुपारी 3 वाजता आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
३.३० वाजता अग्निशमन दलाने तेथे पोहोचून आग आटोक्यात आणली. स्थानकाच्या कॅन्टीनला आग लागल्याचे समजताच परिसरात प्रचंड घबराट पसरली. मात्र चेंगराचेंगरीसारखी स्थिती झाली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रवाशांना स्थानकातून बाहेर काढण्यात आले आणि अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या.
मुंबईत २४ तासांत आगीची ही दुसरी मोठी घटना आहे. अंधेरी भागात बुधवारी पहाटे काही कारला आग लागल्याने ४५ वर्षीय व्यक्ती भाजून जखमी झाली आहे.
अंधेरी (पूर्व) येथील महाकाली लेणी रोडवरील ट्रान्स रेसिडेन्सीसमोर ही घटना घडली. या आगीत तीन गाड्या जळून खाक झाल्या पहाटे 2.45 च्या सुमारास ही आग विझवण्यात आली.
Discussion about this post