पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी विरोधीपक्षनेता अमृत पऱ्हाड यांचे दि. ११ डिसेंबर रोजी अल्प आजाराने निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते.
भाजपचे स्थापनेपासून कार्यकर्ता असलेल्या पऱ्हाड यांची राजकीय कारकिर्द भारतीय जनता युवा मोर्चा मधून सुरू झाली. ते भाजयुमोचे पुणे जिल्हाध्यक्ष होते. पिंपरी महापालिकेत ते सलग ४ वेळा निवडून आले होते. विरोधीपक्ष नेता पदही त्यांनी भूषविले होते.
त्यांच्या पश्चात पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
Discussion about this post