पिंपरी : पिंपरी महापालिकेच्या प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या मृत्यूचे पडसाद आज विधीमंडळात उमटले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्याचा निर्णय विधानसभेत जाहीर केला असून हे प्राणीसंग्रहालय वनविकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देशही महापालिकेला मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पिंपरी महापालिकेचे निसर्गकवि बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय आहे. या प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांचा म्रुत्यू सन २०१७ ते २०२३ या काळात झाला आहे.या प्राणीसंग्रहालयाच्या नुतनीकरणाचे काम सुरू असून २०१७ पासून ते बंद आहे. या संदर्भात चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासात मुद्दा उपस्थित केला त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सदस्य नाना पटोले, योगेश सागर यांनी भाग घेतला.
Discussion about this post