Pimpri News : पिंपरी : महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी १६ मार्च रोजी दुपारी एका तरुणाला अटक करून त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि पाच काडतुसे जप्त केली आहेत.
सोनु नकीक अहमद (वय-31 सध्या रा. महाळुंगे ग्रामपंचायती शेजारी मूळ रा. बहादूरपूर कच्छा, फुलपूर, प्रयागराज, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेकायदा शस्त्रे बाळगणार्यांचा शोध सध्या पोलीस प्राधान्यक्रमाने करत आहेत. महाळुंगे पोलीसचौकीचे अंमलदार अमोल माटे यांना शनिवारी दुपारी महाळुंगे आंबेठाण रस्त्यावर द्वारकासिटी जवळ असलेल्या चिकनसेंटर समोर एक तरुण उभा असून त्याच्याकडे पिस्तूल आहे अशी माहिती मिळाली. पोलीसपथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि ५ काडतुसे मिळाली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त शिवाजी पवार, सहायक आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नितीन गिते, निरीक्षक गुन्हे संतोष कसबे, सहायक निरीक्षक कल्याण घाडगे, अंमलदार राजू राठोड, राजेंद्र कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, विठ्ठल वडेकर,प्रकाश चाफळे, राजु जाधव, संतोष काळे, सांगळे, शिवाजी लोखंडे, राजेंद्र खेडकर, गणेश गायकवाड, अमोल माटे, संतोष वायकर, मंगेश कदम यांनी केली.
Discussion about this post