Pimpri News : पिंपरी : मोरेवस्ती, चिखली येथील १८ मुलींनी शिवजयंतीनिमित्त तिकोना ते मोरेवस्ती अशी ४४ किलोमीटर शिवज्योत घेऊन दौड करत शिवछत्रपतींना अभिवादन केले.मागील वर्षीही त्यांनी अशीच कामगिरी केली होती. या सर्व मुली ७ ते २४ वयोगटातील आहेत. त्यांच्या या कामगिरीची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. या सर्व मुली श्री गणेश व्यायाम मंडळाच्या सदस्य आहेत.
दिप्ती पाटिल, भक्ती दहिफळे,श्वेता लिमन,श्रुती कांबळे, सानिका माने, आराध्या भोर, रेवा अव्हाड, गार्गी महाजन, दुर्वा गारगोटे, ज्ञानेश्वरी पोपळघाट, माही चौधरी, तनुश्री चौधरी, साक्षी माने, जान्हवी माने या मुलींनी ही दौड केली.
त्यांना व्यायाम मंडळाचे अध्यक्ष संजय शेलार, मल्लखांब प्रशिक्षक अक्षय खानविलकर, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक प्रशिक्षक सागर चव्हाण, र्हिदमिक जिम्नॅस्टिक प्रशिक्षक श्रद्धा शेलार, कराटे प्रशिक्षक मंगेश काटकर, शिवकालीन युद्धकला प्रशिक्षक प्रफुल्ल प्रधान यांचे मार्गदर्शन लाभले.
या विक्रमासाठी त्यांना दीपक महाजन, गुणवंत इंगळे, हेमनाथ पिल्ले, आरती बुगदलवार, माधुरी आव्हाड, वैशाली महाजन, अंजली पांडे, सविता लिमण, छाया कांबळे, मंजू चौधरी, दिपाली भोर यांचे सहकार्य लाभले.
Discussion about this post