Maharashtra : संभाजीनगर : संभाजीनगर येथील आज दि. २३ फेब्रुवारी रोजी असलेल्या आढावा बैठकीला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या चिफ इंजिनिअरने दांडी मारली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच खवळले. त्यांनी सर्वांनाच धारेवर धरले.
चिफ इंजिनिअरना बैठकीला यायला काय अडचण होती? आम्ही इथे माशा मारायला आलो आहोत का? अस्ला निष्काळजीपणा मी खपवून घेणार नाही. त्यांना तात्काळ बोलावून घ्या! असे संबंधितांना सुनावत त्यांनी सर्वांची हजेरी घेतली.
दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण करून बैठकीचे कामकाज सुरू झाले. मंत्री अतुल सावे आणि संदिपान भुमरे या बैठकीला उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे. मात्र, विकासकामांसाठी निधी दिला असूनही तो खर्च झाला नसल्याने उपमुख्यमंत्र्यांचा पारा चढला.त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर एका महिन्यात सगळा निधी खर्ची घालून मोकळे होऊ नका. कामे नीट करा. पाणीपुरवठा योजनांव्यतिरिक्त अन्य कामे आचारसंहिता लागल्यावर थांबतील त्यामुळे प्रशासकीय मान्यता वगैरे लवकर घ्या. आचारसंहिता लागण्यापूर्वी कामे सुरू करा असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
Discussion about this post