Pimpri News : पिंपरी : देहुरोड येथे ५ मार्च रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास एका २३ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. मृत तरुणाचे वडील शिवसेना (उबाठा) गटाचे विभागप्रमुख आहेत.
विशाल विजय थोरी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे,त्याच्यावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने दगड, लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे.
हा प्रकार विकासनगर, किवळे परिसरात श्री साई दर्शन कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या जवळ घडला असून काही मृत विशाल याच्यावर तेथे आलेल्या हल्लेखोरांनी त्याला काही कळण्याच्या आत दगड, सिमेंट ब्लॉक्स, काठ्या यांनी हल्ला चढविला. त्याच्या डोक्यात आणि तोंडावर फुलझाडांच्या कुंड्या फेकून मारण्यात आल्या. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या विशालचा मृत्यू झाला.
पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात पाठविला आहे.
Discussion about this post