व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी, ता. २९ : एका ज्येष्ठ नागरिकाच्या तोंडाला मिरची पावडर चोळुन तब्बल २७ लाख २५ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम चोरुन नेणाऱ्या चोरट्यांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले आहे. या चोरट्यांकडुन पोलीसांनी ११ लाख ३५ हजार ४०० रोख रक्कम आणि इतर मालमत्ता असा एकुण २२ लाखाचा माल हस्तगत केला आहे.
हि घटना निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत यमुनानगर परीसरात मंगळवार (ता.१४) रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली होती.
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी पत्रकार परीषदेत दिलेल्या माहितीनुसार, मनी ट्रान्सफरची २७ लाख २५ हजार ८०० हि रोख रक्कम घेवुन जाणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला निगडीतील यमुनानगर परीसरात लुटण्यात आले होते. पाठीमागुन दुचाकीवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी या ज्येष्ठ नागरिकाच्या तोंडावर मिरची पावडर टाकुन हे कृत्य केले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या विविध पथक तसेच तांत्रिक विश्लेषन विभाग यांनी जवळपास २०० ते २५० सीसी टिव्ही फूटेज तपासले. चोरटे ज्या दिशेने पळुन गेले होते. ती दिशा व स्पॉट यांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला.
विशाल साहेबराव जगताप (वय- २५ वर्ष, रा. श्रीराम कॉलनी, टॉवर लाईन, चिंचेचा मळा, मोरेवस्ती, चिखली, मुळपत्ता- मु.पो. संक्रापुर, ता. राहुरी, जि. अहमदनगर), २) लालबाबु बाजीलाल जयस्वाल (वय- २८ वर्ष, रा. मोबाईल शॉपी, रा. मुळ बकरी बाजार, तहसील भाटपाराणी, जि. देवारीया, राज्य-उत्तरप्रदेश, सध्या रा. तुळजाभवानी चौक, चिखली, टॉवर लाईन, चिखली), ३) जावेद अकबर काझी (वय- ५० वर्ष, रा.फ्लॅट नं. ४, ताजविस्टा किवळे, देहुरोड), ४) अभिषेक दयानंद बोडके (वय- १९ वर्ष, रा. बोडके निवास, माऊली हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली), ५) धिरेंद्र सिंग असवाणी सिंग (वय- ३८ वर्ष, रा. संगम हौसिंग सोसायटी, टॉवर लाईन, मोरेवस्ती, चिखली) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तर इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी ज्येष्ठ नागरिक प्रकाश भिकचंद लोढा (वय- ६८ वर्ष, एलआयजी कॉलनी, सिंधुनगर, प्राधिकरण, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, संतोष पाटील, सहायक निरीक्षक अंबरिष देशमुख, उप-निरीक्षक इम्रान शेख, भरत गोसावी, गणेश माने, दरोडा विरोधी पथक, युनीट १,२,३,४ खंडणी विरोधी पथक व तांत्रिक विश्लेषन विभागातील अंमलदार यांच्या पथकाने मिळुन हि कारवाई केली आहे.
Discussion about this post