व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी-चिंचवडमधील आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित केला असून,
सदर रेकॉर्ड शनिवार, दि. २ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता करण्यात येईल. तसेच, रिव्हर सायक्लोथॉन रॅली ही रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता मुख्यत्वे तीन विभागात होणार आहे. पाच किलोमीटर, १५ किलोमीटर आणि २५ किलोमीटर असे हे विभाग आहेत. या रॅलीसाठी २५ हजारपेक्षा जास्त सायकलिस्ट येतील असा अंदाज आहे, असा दावा आयोजकांनी पत्रकार परिषदेत केलाआहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इंद्रायणी स्वच्छता जनजागृती अभियान अंतर्गत ‘रिव्हर सायक्लोथॉन- २०२३’ चे आयोजन केले आहे. या उपक्रमाचे हे आपले ६ वे वर्ष आहे. “आपली इंद्रायणी नदी सर्वांनी प्रदूषित न करता स्वच्छ ठेवावी. या संकल्पनेवर भर दिला आहे. तसेच, गतवर्षी या उपक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली आहे.
यावर्षीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रॅलीचे सारथ्य पिंपरी-चिंचवडच्या पोलीस विभागाकडून करण्यात येणार आहे. तसेच, पोलीस विभागाकडून लोकांनी रहदारीचे नियम काटेकोर पाळण्याचे आवाहनसुद्धा या रॅलीद्वारे करणार आहेत.
प्रत्येक आठवड्याचा सोमवार हा ‘हॉर्न फ्री’ म्हणजेच हॉर्न न वाजवता कसा घालवता येईल म्हणजेच ध्वनी प्रदूषण सुद्धा टाळता येईल आणि प्रत्येक आठवड्याचा बुधवार हा सायकल दिवस म्हणून पाळला जावा म्हणजे हवेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल व आरोग्य सुधारेल याचा प्रयत्न करण्याचे आवाहन पोलीस विभाग करणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे बापू गायकवाड, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे बापू बांगर, वाहतूक विभागाचे श्री. साळुंखे, गिनीस वर्ल्ड रेकॉर्डसब चे भारतातील फॅसिलिटेटर मिलिंद वेर्लेकर तसेच इतर सामाजिक संस्थातर्फे डब्ल्युटीई इन्फ्रा चे विवेक जोशी, आयआयबीचे अॅड. लोहारे, रोटरी क्लब ऑफ उद्योग नगरीचे प्रेसिडेंट विवेक येवले, लायन्स क्लब ऑफ भोजापुर गोल्डचे प्रेसिडेंट डॉ. गायकवाड उपस्थित होते.
Discussion about this post