Pune News : पुणे : अॅन्टीकरप्शन खात्याच्या पथकाने वडगाव मावळ येथे कारवाई करत २५ हजार रुपयांची लाच घेताना एका तलाठ्याला ‘रंगेहाथ’ पकडले.१८ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली.
सखाराम कुशाबा दगडे, वय ५२ वर्षे असे पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात एका व्यक्ती तक्रार दिली आहे.
तक्रारदाराच्या शेतीच्या गटाची फोड केल्याची नोंद सातबाराला करावयाची होती. हे काम करण्यासाठी सखाराम दगडे याने ५० हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने अॅन्टीकरप्शन खात्याकडे तक्रार केली. अॅन्टीकरप्शनच्या अधिकार्यांनी १८ मार्च रोजी सापळा रचला आणि वडगाव मावळ येथे जुन्या मुंबई पुणे महमार्गालगत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरानजिकच्या मोकळ्या जागेत सखाराम दगडे याला त्याने मागितलेल्या ५० हजारांपैकी पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले.त्याच्यावर वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अॅन्टीकरप्शनचे उपाधिक्षक नितीन जाधव यांनी ही माहिती दिली.
ही कारवाई अॅन्टीकरप्शनचे अधीक्षक अमोल तांबे, अपर अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
Discussion about this post