व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -इंद्रायणी स्वच्छता जनजागृती मोहिम अभियान अंतर्गत रविवारी (दि. २७) रीव्हर सायक्लोथॉन भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून आयोजित रीव्हर सायक्लोथॉन या रॅलीचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सिने अभिनेते प्रवीण तरडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, PMRDA आयुक्त राहुल महिवाल यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती संयोजक डॉ. निलेश लोटे, सचिन लांडगे यांनी दिली.
नदी स्वच्छता ही आजची एक प्रमुख गरज झाली आहे. पाला कारण भणजे वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरण, वाढत्या शहरीकरणामुळे तसेच औद्योगिकीकरणांमुळे शहरभर कचरा आणि घाणीचे साम्राज्य वाढत आहे आणि त्याचा आघात आपोआपच नदीवर होत आहे. या सर्वांचा हा वाढता ताण पडतो तो प्रामुख्याने प्रदूषणावर.. पर्यायाने महानगरपालिकेवर.. ह्या तयार होणाऱ्या कचऱ्यात बऱ्याच गोष्टी रिसायकल करण्यासारख्या असतात. त्या रिसायकल केल्यास नदीत किंवा अन्य ठिकाणी जाणारा कचरा कमी होऊ शकतो. पर्यायाने प्रदूषण कमी करण्यास मदत होते. आपल्याला नदी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे व त्यासाठी सामान्य माणसाला या रिसायकलिंग बद्दल जागे करणे नितांत आवश्यक झाले आहे. म्हणूनच या जनप्रबोधनासाठी या रिव्हर सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे. यालाच अनुसरून या वर्षी आपण Recycle, Reduce, Reuse to Save Enviorment हि संकल्पना मांडत आहोत. या विशेष कार्यक्रमांतर्गत प्रत्येक घरापर्यंत पोहचण्यासाठी एक विशेष मोहिम राबवून पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व शाळांमध्ये सोसायट्यांमध्ये, कंपन्यामध्ये जावून पर्यावरण संवर्धना अंतर्गत आयकल चालवा पर्यावरण वाचवा नदी स्वच्छता या विषयांतर्गत आम्ही सर्व पर्यावरण प्रेमी जनजागृती करत आहोत व रिव्हर सायक्लोथॉन रैली मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहोत.
या अभिनव उपक्रमाला रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी, पर्यावरण यतविधी, होप मानसिक पुनर्वसन व व्यसनमुक्ती केंद्र, डॉक्टर्स असोसिएशन, फार्मासिस्ट असोसिएशन, वकील संघटना, रोटरी क्लब, लायन्स क्लब, माजी सैनिक संघटना, पतंजली योग, महाराष्ट्रातील सर्व सायकल प्रेमी संस्था, सर्व पर्यावरणप्रेमी संस्था, आदींनी पाठींबा असून प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यातील एक रॅली ते लीड करत आहेत.
इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती साठी २७ नोव्हेंबर २०२२ रोजी भोसरी गावजत्रा मैदान येथे भव्य रिव्हर सायक्लोथॉन रैली दरवर्षी प्रमाणे आयोजित करत आहोत. हे आमचे पाचवे वर्ष आहे. तरी सदर उपक्रमास दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्टस फॉडेशन व पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, पर्यावरणप्रेमी संस्थां यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. यावर्षी आणि साधारणपणे २५,००० सायकलिस्ट येतील अशी अपेक्षा करत आहोत.
Discussion about this post