व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पालिका भवनाच्या तळमजल्यावर दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्रपणे आवश्यक सुविधायुक्त शौचालय तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ते महिनाअखेरीस ते पूर्ण होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी यांनी दिली.
दिव्यांग बांधवांना पालिकेच्या विविध कार्यालयात सहजतेने पोहोचता यावे, यासाठी योग्य रॅम्प व्यवस्था असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीनेही पालिका कार्यालय तसेच प्रेक्षागृह, दवाखाने, रुग्णालये, शाळा अशा महत्वाच्या ठिकाणी योग्य रॅम्प व्यवस्था तयार करण्यात आली आहे.
पालिकेत काम करीत असलेल्या दिव्यांग तसेच, तृतीयपंथी कर्मचार्यांसाठी व अभ्यागतांसाठी सुविधायुक्त शौचालयाची आवश्यकता विचारात घेता पालिका इमारतीच्या तळमजल्यावर स्वतंत्रपणे शौचालय तयार करण्यात आले आहे.
Discussion about this post