व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ करिता सहा ब्रँड अँबेसिडर नियुक्त करण्यात आले असून त्यांना काल नियुक्तीपत्र देण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहराला देशातील सर्वात सुंदर शहर बनविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. स्वच्छ भारत अभियान पिंपरी चिंचवड शहरांमध्ये राबविण्यात येत आहे. याकरिता लोकसहभाग महत्त्वाचा आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत स्वच्छतेची लोक चळवळ व्यापक करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान ब्रँड अँबेसिडर नियुक्त करण्यात आले आहे.
क्रीडा वर्गातून पूजा शेलार, ज्येष्ठ अभिनेता वर्गातून सुरेश डोळस, ट्रान्सजेंडर वर्गातून शिवान्या (पंकज बोकील), अपंग ) वर्गातून संगीता जोशी- काळभोर, शिक्षक वर्गातून मनोज देवळेकर आणि समाजसेवकातून गणेश बोरा यांना ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छते विषयक मोहिमेमध्ये त्यांनी सहभागी व्हावे अशी विनंती मनपाने केली आहे. याबाबतचे आदेश विनोद जळक (समन्वयक तथा सहाय्यक आयुक्त, स्वच्छ भारत अभियान पिंपरी चिंचवड महानगरपालिका) यांनी 12 ऑगस्टला काढले आहेत. पण, ब्रँड अँबेसिडर पदी नियुक्तीचे पत्र ब्रँड अँबेसिडर यांना काल प्राप्त झाले आहेत.
Discussion about this post