व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ अंतर्गत सुरु केलेले स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षण विभागाच्या वतीने राज्यस्तरीय पुरुष व महिला आणि आंतरशालेय भजन स्पर्धा दिनांक 28 ते 30 ऑक्टोबर, 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कुल अण्ड जुनिअर कॉलेज, पाटीलनगर, टाळगांव चिखली येथे आयोजित करण्यात आली आहे.
28 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार असून या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अजित पवार – उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री पुणे जिल्हा तर विशेष अतिथी दिलीप वळसे पाटील – मंत्री सहकार, महाराष्ट्र राज्य, चंद्रकांत दादा पाटील – मंत्री उच्च व तंत्रशिक्षण, वस्रोउद्योग, संसदीय कार्ये, महाराष्ट्र राज्य, डॉ.नीलम गोऱ्हे, उपसभापती विधानपरिषद या उपस्थित राहणार आहेत.
Discussion about this post