व्हीएसआरएस मराठी न्युज -नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला होता. डेव्हिड वॉर्नर १०४ धावा, स्टीव्ह स्मिथ ७१ धावा, लाबुशेन ६२ धावा आणि मॅक्सवेल १०६ धावा अशी दमदार बॅटींग आज बघायला मिळाली. ऑस्ट्रेलियाचे सर्वच फलंदाज आज स्वत:चा फॉर्म परत आणण्यासाठी दुबळ्या नेदरलॅण्ड समोर जोमात खेळल्यामुळे ५० षटकात ४०० धावांचे खडतर आव्हान ऑस्ट्रेलिया संघाला उभे करता आले. हा सामना आज राजधानी दिल्लीत खेळला गेला.
मॅक्सवेल – वर्ल्डकप इतिहासातले वेगवान शतक
विश्वचषक स्पर्धा ही इतिहासातील आकडेवारी बदलण्यासाठीच असते याचा आज प्रत्यय आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने अगदी टी२० स्टाईलमध्ये नेदरलॅण्डच्या नवख्या गोलंदाजांची धुलाई करीत अवघ्या ४० चेंडूत १०० धावा केल्या. आजपर्यन्तच्या विश्वचषक इतिहासातली ही सर्वाधिक कमी चेंडूतली सेंच्युरी ठरली आहे. मॅक्सवेल १०६ धावांवर बाद झाला. मुळात मॅक्सवेल ६ व्या क्रमांकावर खेळायला आला तेव्हाच ऑस्ट्रेलियाचा संघ सुस्थितीत होता. डेव्हीड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि लाबुशेन यांनी एक भक्कम धावसंख्या उभारलेली होती. मॅक्सवेलने याच परीस्थितीचा फायदा उचलत तब्बल ८ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १०६ धावांची वेगवान खेळी उभारली. नेदरलॅण्डच्या लोगन वीकने ४ बळी घेतले खरे परंतु त्यासाठी त्याला ७.४० च्या सरासरीने धावा मोजाव्या लागल्या.
Discussion about this post