व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –
राज्यस्तरीय स्पर्धेत १९ जिल्ह्यातील एकूण १३० दिव्यांग जलतरणपटू सहभागी झाले होते. महाराष्ट्र पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर नाळे, चेअरमन राजाराम घाग यांच्या हस्ते जलतरण तलावाचे पूजन करून स्पर्धेला प्रारंभ झाला.
पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन (महाराष्ट्र) संलग्न पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया संलग्न आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीच्यावतीने व पॅरास्पोर्ट्स असोसिएशन (ठाणे) यांच्या पुढाकाराने कल्याणमधील स्पोर्ट्स क्लबमध्ये पार पडलेल्या १८ व्या राज्यस्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील जलतरणपटूंनी भरघोस पदकांची कमाई केली.
पदक विजेते जलतरणपटू खालीलप्रमाणे
तृप्ती दिलीप चोरडिया : ३ सुवर्ण (१०० मीटर फ्री स्टाइल, बॅक स्ट्रोक व ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक)
गौतम मांजरे : रौप्य- १०० मीटर बॅक स्ट्रोक, कांस्य पदक – १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक
स्वप्नाली रतन तांबे : दोन रौप्य १०० मीटर बॅक स्ट्रोक, १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक
सुचित्रा सुनील खरवंदीकर : सुवर्ण – १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक.
निलेश दिलीप लाळगे : कांस्य – १०० मीटर फ्री
स्टाइल
वैष्णवी विनोद जगताप : सुवर्ण -१०० मीटर फ्री स्टाइल,
संकल्प बोत्रे : दोन रौप्य – १०० मीटर फ्री स्टाइल व ब्रेस्ट स्ट्रोक,
अजय हिंदुराव भोसले : रौप्य – १०० मीटर फ्री स्टाइल
मेंटली चॅलेंज्ड जलतरणपटू
चिन्मय संतोष पाठक : तीन रौप्य – १०० मीटर फ्री स्टाइल, बॅक स्ट्रोक व बटरफ्लाय
सौमिल रवींद्र कोवाडकर : तीन सुवर्ण -१०० मीटर फ्री स्टाइल, ब्रेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक
हर्ष सुनील बाबर : रौप्य – १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक
ऋत्विक जोशी : सुवर्ण – १०० मीटर बटरफलाय
दोन कांस्य ः १०० मीटर फ्री स्टाइल, ब्रेस्ट स्ट्रोक
गौरी गाडगीळ : सुवर्ण – १०० मीटर फ्री स्टाइल
ऋचा चितळे : सुवर्ण – १०० मीटर बॅक स्ट्रोक
या सर्वांना ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान गुवाहाटी (आसाम) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या प्राथमिक निवड यादीत स्थान मिळाले आहे.
महाराष्ट्र पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर नाळे, चेअरमन राजाराम घाग यांच्या हस्ते जलतरण तलावाचे पूजन करून स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळी ठाणे विभागाच्या अध्यक्षा अर्चना जोशी, खजिनदार सत्यप्रकाश तिवारी, सचिव गणेश जगताप यांच्यासह अन्य मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. अभय देशमुख यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेतील १५ स्पर्धकांना गुवाहाटी येथे होणाऱ्या राष्ट्रीय दिव्यांग जलतरण स्पर्धेसाठी राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याची माहिती नंदकिशोर नाळे यांनी दिली.
Discussion about this post