व्हीएसआरएस मराठी न्युज –सांगवीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची दुरवस्था झाल्याने सांगवीतील व परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत. रोज सकाळी व सायंकाळी नागरिक व्यायामासाठी तसेच फिरण्यासाठी उद्यानात येतात. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे दुर्लक्ष झाल्याने या उद्यानातील जॉगिंग ट्रॅकवर वाढलेले शेवाळे, बेसुमार उद्यानात वाढलेले गवत, अस्वच्छता, ओपन जीमचे मोडकळीस आलेले साहित्य, मेंटन्स नसल्याने बंद अवस्थेत असलेले ओपन जीमचे साहित्य, घाणीमुळे उद्यानात वाढलेले मच्छर शहरात डेंग्यूची साथ असताना त्यात भर त्याच बरोबर भटकी कुत्री व नामधारी सुरक्षा रक्षक असल्याने फुलांची होणारी तोड व झाडांचे नुकसान सुसज्ज लॉनवर फुटबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट असे खेळ सरासपणे खेळले जातात.
याकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकाने लक्ष घालून
सांगवीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सुव्यवस्थित करावे. तसेच डेंग्यूची साथ वाढू नये म्हणून
फॉगिंग करावे. ओपन साहित्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सांगवीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची दुरवस्था
सांगवीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची दुरवस्था झाल्याने सांगवीतील व परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत. रोज सकाळी व सायंकाळी नागरिक व्यायामासाठी तसेच फिरण्यासाठी उद्यानात येतात. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे दुर्लक्ष झाल्याने या उद्यानातील जॉगिंग ट्रॅकवर वाढलेले शेवाळे, बेसुमार उद्यानात वाढलेले गवत, अस्वच्छता, ओपन जीमचे मोडकळीस आलेले साहित्य, मेंटन्स नसल्याने बंद अवस्थेत असलेले ओपन जीमचे साहित्य, घाणीमुळे उद्यानात वाढलेले मच्छर शहरात डेंग्यूची साथ असताना त्यात भर त्याच बरोबर भटकी कुत्री व नामधारी सुरक्षा रक्षक असल्याने फुलांची होणारी तोड व झाडांचे नुकसान सुसज्ज लॉनवर फुटबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट असे खेळ सरासपणे खेळले जातात.
याकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकाने लक्ष घालून
सांगवीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सुव्यवस्थित करावे. तसेच डेंग्यूची साथ वाढू नये म्हणून
फॉगिंग करावे. ओपन साहित्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Discussion about this post