व्हीएसआरएस मराठी न्युज भोसरी- विश्व श्रीराम सेना आयोजित आज छठ महापर्वाच्या चौथ्या दिवशी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन लोकश्रद्धेचा महान सण छठची सांगता झाली. संपूर्ण पिंपरी चिंचवड जय छठी मैयाने दुमदुमून गेला.
उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये आज छठ महापूजा साजरी करण्यात आली. शहरातील एकूण 17 घाटांवर श्रद्धा, पूजा आणि भक्तीमय वातावरणात छठपूजा साजरी करण्यात आली.
मोशी येथील इंद्रायणी नदी घाटावर छठ पूजा उत्सवानिमित्त महाकुंभ संपन्न झाला. काशी गंगा आरतीचे अद्भूत दृश्य पाहण्यासाठी भाविकांचा महासागर उसळला होता. यावेळी विश्व श्री राम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.लालबाबू गुप्ता यांच्या विशेष निमंत्रणावरून 1008 महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज, सुदर्शन टीव्हीचे प्रमुख व राष्ट्र निर्माण संस्थेचे संस्थापक सुरेश चव्हाणके, श्यामजी महाराज, पुणे विद्यापीठाचे सदस्य राजेश पांडे उपस्थित होते.
मोशी येथील पवित्र इंद्रायणी नदी घाटावर उत्तर भारतीय नागरिकांनी महाछठ पर्व परंपरागत विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा केला. यासाठी इंद्रायणी नदी घाटावर दुतर्फ़ा हजारो उत्तर भारतीय नागरिक, भाविकांनी मोठी गर्दी करून व्रत जोपासले.
लोकश्रद्धेचा महान सण असलेल्या छठची रंगत संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळाली. सोमवारी महापर्वाच्या चौथ्या दिवशी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन महापर्वाची सांगता झाली. उगवत्या सूर्याची आराधना केल्यानंतर, छठ व्रत मोडून 36 तासांचा निर्जल उपवास सोडला जाईल. मोशी इंद्रायणीमध्ये छठ उत्सवात मोठा उत्साह दिसून आला. घाटावर श्रद्धेची वर्दळ होती.
खर्नानंतर रविवार हा छठचा तिसरा दिवस होता. मावळत्या सूर्याला भाविकांनी अर्घ्य दिले. तर 31 ऑक्टोबर रोजी उगवत्या सूर्याला अर्घ्य दिले गेले. छठ व्रत खरना पासून, एक 36 तास निर्जल उपवास पाळतो. छठ व्रत महाराष्ट्र सह पिंपरी चिंचवड इतर घाटांवर मावळत्या सूर्याला अर्घ्य देऊन भगवान भास्करची पूजा करण्यात आली . मोशी इंद्रयाणी घाट इतर घाटांवर पिंपरी महानगरपालिका कडून अर्घ्याबाबत विशेष व्यवस्था करण्यात आली होती. डॉ लालबाबु गुप्ता व परीवार बरोबर मोशी इंद्रायणी घाट वर भगवान सूर्याला जल अर्पण केले.
यावेळी भोसरी पोलीस ठाण्याचे वतीने पोलीस बंदोबस्त व वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. इंद्रायणी नदीघाटावर यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. छठ पूजा महापर्वाचे विश्व श्रीराम सेने चे डॉ लालबाबु गुप्ता समितीचे वतीने उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
Discussion about this post