व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पिंपरी ते निगडी विस्तारित मेट्रो मार्गाच्या डीपीआरला राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात या कामासाठी 1 हजार 206 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
त्यामुळे लवकरच पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाला सुरुवात होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
राज्य सरकारने निगडीपर्यंतच्या विस्ताराला मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. मात्र, या मार्गाचे शेवटचे स्टेशन निगडी भक्ती-शक्ती चौकात होणार आहे. हा भाग रेडझोनमध्ये समाविष्ट होत असल्यामुळे केंद्रीय संरक्षण विभागाच्या परवानगीसाठी हा प्रस्ताव रखडला आहे.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पुणे महामट्रो विस्तारीकरणासाठी 1 हजार 206 कोटींची तरतूद केली आहे. पिंपरी ते निगडी मेट्रो या 4.413 कि.मी विस्तारीकरणाचा अपेक्षित खर्च 910 कोटी 18 लाख एवढा आहे. यामध्ये केंद्र व राज्य सरकार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा हिस्सा समाविष्ट असणार आहे.
Discussion about this post