व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी – चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालपासुन मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत वंचित ही भाजपाची बी टीम असून बी टीम वाढविण्यापेक्षा महाविकास आघाडी सोबत राहून विन टीम वाढवु असे म्हणत वंचित बहुजन आघाडी च्या शहराध्यक्षांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यातच काल चिंचवड पोटनिवडणूकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांना रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी पाठिंबा पत्रकार परिषदेत जाहीर केला. यावर नाराजी व्यक्त करत रिपब्लिकन सेनेचे माजी युवक शहर अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर यांनी प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे प्रचारसभेत उपस्थित असताना वंचित बहुजन आघाडी मध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.
Discussion about this post