व्हीएसआरएस मराठी न्युज -महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. रविवारी 16 एप्रिल रोजी सोहळा पार पडणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार आहे. नवी मुंबई मधील खारघर येथील कॉर्पोरेट पार्क मैदानात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीस रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, महेश बालदी तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन काळजीपूर्वक करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कोकण परिक्षेत्रातील प्रत्येक महापालिकेने उपयुक्त दर्जाचा अधिकारी प्रत्येक गोष्टीचा समन्वय राखण्यासाठी नेमावा. तसेच सर्व घटकांनी जबाबदारीच भान ठेऊन दिलेली जबाबदारी पार पाडावी. कार्यक्रमाला लाखो नागरिक येणार असल्याने काळजीपूर्वक नियोजन करण्याचे निर्देश ही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी महामार्गांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या तीनही महामार्गांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. १४ एप्रिलला रात्री १२ ते १६ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.
Discussion about this post