व्हीएसआरएस मराठी न्युज –महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपा नेते मंत्री चंद्रकांत पाटील आणि कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांना पुण्यातील गंज पेठ येथील कार्यक्रमात ओवाळून भाऊबीज साजरी केली.
भोई प्रतिष्ठानने गंज पेठेतील अग्निशामक विभागाच्या मुख्य कार्यालयात भाऊबीज कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार रवींद्र धंगेकर, आयोजक मिलिंद भोई यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. यावेळी हा राजकीय भाऊबीजेचा कार्यक्रम सुद्धा झाला.
यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या, १६ वर्षापासून अग्निशामक विभागाच्या भाऊबीज कार्यक्रमाला येते. या निमित्ताने सर्वांशी बोलता येते. सार्वजनिक जीवनात काम करण्यास ऊर्जा मिळते.
चाकणकर म्हणाल्या, आज या कार्यक्रमात भाजपा नेते मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार रवींद्र धंगेकर यांना ओवाळले आहे.
पण माझे बंधू जयंत पाटील यांना डेंग्यू झाला आहेत, ते आजारी आहेत. ते लवकर बरे होतील.
जयंत पाटील यांनी फोन करून मला भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Discussion about this post