व्हीएसआरएस मराठी न्युज –एकदिवसीय क्रिकेट वनडे वर्ल्डकपच्या पहिला उपांत्य फेरीचा सामना वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. या समन्यात भारताने 70 धावांनी न्यूझीलंडचा पराभव करत वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे.
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये फक्त सहावा सामना खेळत आहे. सेमीफायनल मॅचमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 4 विकेट घेत शमी पुन्हा एकदा आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.
त्याचे अजून चार षटके बाकी आहेत. त्याच्या पहिल्या दोन षटकांत त्याने संघाला पहिले दोन यश मिळवून दिले. त्यानंतर विल्यमसन आणि मिशेल क्रीझवर असताना तो आला आणि त्याने एकाच षटकात दोन बळी घेतले. त्याने वर्ल्डकपमध्ये 50 विकेट्सही पूर्ण केल्या. या विश्वचषकात सहाव्या सामन्यातच 20 विकेट घेणार्या मोहम्मद शमीने भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. आता 50 विकेट घेणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. तसेच, तो जगातील सर्वात जलद 50 विश्वचषक विकेट घेणारा खेळाडू बनला आहे. त्याने सर्वात कमी सामने आणि सर्वात कमी चेंडू अशा दोन्ही बाबतीत हा विक्रम आपल्या नावावर केला आणि ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला मागे टाकले.
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड- डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
Discussion about this post