व्हीएसआरएस मराठी न्युज –
अभियांत्रिकी, फार्मसी व नर्सिंगमध्ये पदवी आणि विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, फार्मसी आणि नर्सिंग मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) ने आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतील परंतु शैक्षणिकदृष्ट्या होतकरू तरुणींना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आणि संपूर्ण अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ति मिळवण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या २७ वर्षांमध्ये एलपीएफ ने महाराष्ट्रातील पुणे, वर्धा, अमरावती जिल्हा आणि नागपूर शहर, तेलंगणातील हैदराबाद आणि कर्नाटक राज्यातील बेंगळुरूमधील १२,५०० हून अधिक मुलींना व तरुणींना शिष्यवृत्ती दिली आहे सोबतच त्यांच्यासाठी आवश्यक अश्या कौशल्य विकास कार्यक्रमांचे देखील आयोजन केले आहे.
अर्ज करण्यासाठी पात्रता निकष असलेले शिष्यवृत्ती अर्ज पुढील लिंकवर उपलब्ध आहेत: https://www.lpfscholarship.com
अधिक तपशिलांसाठी, कृपया कु. अस्मिता शिंदे/ कु. माधुरी नलवडे यांच्याशी एलपीएफ ऑफिसच्या लँडलाइनवर ०२० – २७२२४२६४ / ६५ किंवा मोबाइल नंबरवर ८६६९९९८९८१
संपर्क साधा किंवा ईमेल : [email protected] वर देखील संपर्क करता येईल.
(संपर्काची वेळ: सोमवार ते शनिवार सकाळी ११:०० ते दुपारी ४वाजता) अधिक जाणून घेण्यासाठी कृपया एलपीएफच्या वेबसाइट https://www.lilapoonawallafoundation.com ला भेट द्या. त्वरा कर! ही सुवर्णसंधी चुकवू नका! फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह तत्त्वावर मर्यादित ऑनलाइन अर्ज उपलब्ध आहेत.
बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग (४ वर्षे), बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग डिप्लोमा नंतर (३ वर्षे), बॅचलर ऑफ सायंन्स इन नर्सिंग (४ वर्षे), बॅचलर ऑफ फार्मसी (4 वर्षे) आणि पदव्युत्तर (2 वर्षे) मधील कोणत्याही आभ्यासक्रमासाठी जसे की मॅथेमॅटिक्स , एनालिटिकल केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, स्टॅस्टेस्टीक, इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर एप्लीकेशन, फार्मर्सी आणि नर्सींग या अभ्यासक्रमांसाठी गरजू आणि इच्छुक तरुणी अर्ज करू शकतात.
Discussion about this post