व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-शहरातील ई-वाहनांसाठी महापालिकेकडून शहरात आजपासून २१ ठिकाणी ई-चार्जिंग स्टेशन सुरू केली जाणार आहेत.
महावितरण कंपनीने स्वतः राज्यभरात ५० ठिकाणी ( पुणे शहरात ८ ठिकाणी) विजेवर धावणाऱ्या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणी केली आहे. तेथे १३.२५ रुपये प्रति युनिट या दराने चार्जिंग सुविधा उपलब्ध आहे. मग, पुणे महापालिका १९ रूपये प्रति युनिट दर, का असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. तसेच, महापालिकेने कोणत्या ठिकाणी १३ रुपये व कोणत्या ठिकाणी १९ रूपये दर असणार आहे तसेच दरात तफावत हे जाहीर नागरिकांसाठी जाहीर करावे, अशी मागणीही मंचाचे अध्यक्ष वेलणकर यांनी केली आहे.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार, महापालिका शहरात १९ रुपये प्रति युनिट दराने पैसे घेतले जाणार आहेत. मुळात कंत्राटदाराला या सर्व जागा महापालिका देणार असल्याने व चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी सर्व ठिकाणी सारखाच खर्च येणार असल्याने ग्राहकांना चार्जिंगसाठी द्याव्या लागणाऱ्या प्रती युनिट दरात १३ ते १९ रुपये एवढी तफावत का ? असा सवाल मंचाने उपस्थित केला आहे.
Discussion about this post