व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पीएमपीच्या एकूण 450 हून अधिक वातानुकुलित ई-बस प्रवाशांच्या सेवेत आहेत. नागरिकांना देखील साध्या बसच्या तिकीट दरात गारेगार प्रवास करता येत असल्याने नागरिकांची या बसला पसंती आहे. पण, बऱ्याच वेळा या बसमध्ये एसीच बंद असल्याचे निदर्शनास आले आहे.
चालकांकडून ई-बसची चार्जिंग लवकर संपत असल्यामुळे एसी बंद ठेवण्यात येत आहेत. तर काही ई-बसचा देखभाल दुरूस्ती व्यवस्थीत केला जात नसल्यामुळे मध्येच एसी बंद होत आहेत. ई-बस पूर्णपणे बंदीस्त असल्यामुळे एसी बंद ठेवल्यास नागरिकांना श्वास घेणे कठीण होते. नागरिकांनी चालक आणि वाहकांना विचारणा केली असता चालक आणि वाहक उडावाउडवीची उत्तरे देतात.
ई-बसचा एसी सुरू आहे की नाही, हे तपासल्याशिवाय बस मार्गावर घेऊन येऊ नये असे आदेश दिले आहेत. तसेच चालक जर चार्जिंगसाठी एसी बंद ठेवत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
– सतीश गव्हाणे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल
Discussion about this post