व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-पुण्यात रविवारी मध्यरात्री गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अमित साहू असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
खडक परिसरातील सिंहगड गॅरेज चौकात ही घटना घडली आहे. या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अमित साहू याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले असून पोलिसांकडून (Police) त्यांचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमित साहू हा पुण्यातील खडक परिसरात राहतो. रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून त्याच्यावर गोळीबार केला. यामध्ये साहू याचा मृत्यू झाला.
स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच खडक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
Discussion about this post