व्हीएसआरएस मराठी न्युज –भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाने 100 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. 230 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे फलंदाज झटपट बाद झाले अन् टीम इंडियाने 20 वर्षानंतर इंग्लंडचा वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) पराभव केला आहे.
धारदार गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने वर्ल्ड कपमधील 6 वा विजय नोंदवला आहे. त्यामुळे आता टीम इंडिया पाईंट्स टेबलच्या अव्वल स्थानी विराजमान झाली आहे. टीम इंडियाकडून रोहित शर्माने सर्वाधिक 87 धावा केल्या. तर मोहम्मद शमीने 7 ओव्हरमध्ये 4 महत्त्वाच्या विकेट्स नावावर केल्या आहेत. तर बुमराहने 3 विकेट घेत इंग्लंडची कंबर मोडली.
टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच प्रथम फलंदाजी केली. इंग्लंडने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, या सामन्यात टीम इंडियाची रनमशिन चालली नाही. त्यामुळे भारतीय संघाला केवळ 229 धावा करता आल्या आहेत. भारताकडून कॅप्टन रोहित शर्माने 101 बॉलमध्ये 87 धावांची झुंजार खेळी केली. तर सूर्यकुमार यादव याने 49 धावांची खेळी करत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याआधी चांगली सुरूवात मिळून देखील केएल राहुलला मोठी खेळी करता आली नाही. अखेरीस बुमराहने टीम इंडियाला फिनिशिंग टच दिला अन् टीम इंडियाचा स्कोर 290 धावांवर पोहोचवला. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत. तर क्रिस वोक्स आणि आदिल रशिद यांनी 2-2 गडी बाद केले.
इंग्लंड : जॉनी बेअरस्टो, डेविड मालन, जो रूट, बेन स्टोक्स, जॉस बटलर (C), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड.
टीम इंडिया : रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
Discussion about this post