Pune News : पुणे : पेरणेफाटा येथील विजयस्तंभास २०६ व्या शौर्यदिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी लक्षावधी आंबेडकर अनुयायांनी काल दि. ३१ डिसेंबर २०२३ च्या रात्रीपासूनच गर्दी केली असून आज या ठिकाणी मोठा जनसागर उसळला आहे.
पिंपरी चिंचवडमधून काल रात्री भीमसैनिकांची एक मोठी मोटारसायकल रॅली विजयस्तंभास आदरांजली वाहण्यासाठी रवाना झाली. आज पहाटेपासूनच राज्यभरातून लाखो भीमसैनिक भीमा कोरेगाव येथे येऊन दाखल होत आहेत.
यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.३२०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ७०० होम गार्ड्स आणि एस. आर. पी. एफ. च्या ६ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
सुमारे साडेचार टन वजनाच्या फुलांची आरास स्तंभावर करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच स्तंभाचे दर्शन घेतले. सर्वांनी शांततेत दर्शन घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
Discussion about this post