Pune News : पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हेशाखा युनिट ५ च्या पथकाने एका सराईत मोबाईल चोरास अटक करत त्याच्याकडून ५५ हजार रुपये किमतीचे ५ मोबाईल जप्त केले आहेत.
परवेझ रहमान शेख, वय ४० वर्षे,राहणार भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द, पुणे असे या सराईताचे नाव आहे.
तो कोंढव्यातील शीतल पेट्रोलपंपाजवळ चोरलेले मोबाईल विकण्यासाठी येणार असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. पोलीसपथक तेथे दबा धरून बसले. परवेज तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५ मोबाईल आढळले.
त्याला पोलिसीखाक्या दाखविल्यानंतर त्याने कोंढवा येथील एका घराचा दरवाजा उघडा असताना व हडपसर येथे बसमध्ये व भाजी मार्केटमधील नागरिकांच्या हातातील मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्याच्या अटकेमुळे पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे.
ही कामगिरी पोलीस उपआयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, सहायक आयुक्त, सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक उल्हास कदम, उपनिरीक्षक अविनाश लोहटे व अंमलदार राजस शेख, प्रमोद टिळेकर, दया शेगर, पृथ्वीराज पांडुळे, स्वाती गावडे, पल्लवी मोरे व राहुल ढमढेरे यांनी केली.
Discussion about this post