Pune News : पुणे : पुणे येथे एका प्रसिद्ध इंजिनिअरींग कॉलेजच्या वसतिगृहात ७ मार्च रोजी एका विद्यार्थिनीने स्वतःला जाळून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्या विद्यार्थिनीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून वसतीगृहाच्या कॅन्टीनमध्ये काम करणारा कामगार आणि तिची रूममेट यांनी केलेल्या मानसिक छळामुळे तिने आत्महत्या केल्याची तक्रार मृत मुलीच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीसठाण्यात केली आहे.
रेणुका बालाजी साळुंके (वय १९) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून तिचे वडील बालाजी धोंडिबा साळुंखे (वय 49, रा. जुळी, जि. लोहारा, जि. उस्मानाबाद) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून वसतीगृहाच्या कॅन्टीनमधील कामगार सतीश जाधव आणि मृत मुलीची रूममेट मुस्कान महेंद्रसिंग सिद्धू (वय १९ वर्षे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश जाधव मृत रेणुकाला सतत ‘आय लव्ह यू’ असे मेसेज पाठवत होता. तर, मुस्कान सिद्धू तिला अभ्यास करू देत नव्हती अभ्यास करताना ती दिवे बंद करायची. या त्रासाला कंटाळून रेणुकाने ७ मार्च रोजी वसतिगृहाच्या बाथरूममध्ये स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली असे तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
Discussion about this post