पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | रोडवर बंद पडलेल्या कंटेनरला ट्रेलर चालकाने पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामध्ये चालकाचा मृत्यू झाला. विकास सुरेंन्द्र (वय.35,रा. रायपुर छत्तीसगढ) असे त्याचे नाव आहे. ही घटना 17 फेब्रुवारी रोजी पहाटे सव्वा पाच वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर हायवे एलाईट चौक उरळी-कांचन येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी किशोर कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Discussion about this post