पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | ऑनलाईन ट्रेडींगच्या बहाण्याने जादा परताव्याचे आमिष दाखून 14 लाख 59 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारकाच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पौड रोड कोथरुड येथील 59 वर्षीय व्यक्तीने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपीने फिर्यादींना मोबाईल व व्हॉटस्अॅपद्वारे संपर्क केला. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादीने याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर ऑनलाईन ट्रेडींगमध्ये पैसे गुंतविल्यानंतर जादा परतावा देण्याचे प्रलोभन दाखविले. त्यानंतर फिर्यादींची 14 लाख 59 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
Discussion about this post